चोरवणे येथे शिवसेनेचा गावभेट कार्यक्रम

0

रत्नागिरी : चोरवणे गावात २४ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा गावभेट कार्यक्रम पार पडला. यावेळी वातावरण भगवामय झाले. आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, संगमेश्वर पं. स. सभापती जया माने, उपतालुका प्रमुख काका कोलते, माजी विभागप्रमुख विलास बेर्डे, शाखाप्रमुख मनोहर मांडवकर, उपशाखाप्रमुख नाना कांबळे, सरपंच दिनेश कांबळे, उपसरपंच अनंत बसवणकर, गावप्रमुख मंदार कात्रे, माजी सरपंच विजय कांबळे तसेच अनेक मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या गावात गेली अनेक वर्षे सेनेने विकासकामे केली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक कामे करण्यात येणार आहेत. तसेच गावातील अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते भगवे झेंडे असलेल्या दुचाकी, या दुचाकींमुळे या परिसरात भगवे वातावरण निर्माण झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:54 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here