संगमेश्वर तालुक्यातील क्रशरवाल्यांची चौकशी करण्याचे आदेश

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटेवांद्री-परिसरातील लोकांना क्रशरचा त्रास होत आहे. क्रशरवाल्यांच्या या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी देवरूख तहसील कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मागण्या पूर्ण करू व तत्काळ क्रशरवाल्यांची चौकशी करण्याचे आदेश देवरूख तहसीलदार सुहास थोरात यांनी दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, युयुत्सु आर्ते, अनिरुद्ध कांबळे, हारीश शेकासन यांनी तहसीलदार यांच्याशी वेळोवेळी ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. टीएस मशीनच्या माध्यमातून क्रशरचालकांच्या उत्खननाची मोजणी, सप्तलिंगी नदीत टाकलेल्या पुलाच्या कामाची चौकशी करणे, तडे गेलेल्या घरांचे स्टक्चरल ऑडिट, सी. सी. टी. व्ही. कॅमेरा बसवणे, दिलेल्या परवानगीप्रमाणे क्रशर सुरू नसून नियमांचे उल्लंघन केल्याकारणी चौकशी, ब्लास्टिंग संदर्भात निर्णय देणे, वाडीत जाणाऱ्या रस्त्याबाबत चौकशी करणे, उक्षी बौद्धवाडी – मुस्लिमवाडी-चर्मकारवाडी आदी वाड्यांमध्ये क्रशरच्या त्रासाबाबत चौकशी करणे यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
नायब तहसीलदार गोताड हे प्रत्यक्षात येऊन चौकशी करणार आहेत. या मागण्यांसाठी गेले तीन दिवस संघर्ष करावा लागला असून अखेर महसूल विभागाने मागण्या मंजूर करून त्याचे लेखी पत्र दिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:39 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here