कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ १३ देशात दाखल

0

जीनिव्हा : कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ व्हेरियंट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह १३ देशांत दाखल झाला आहे. बहुतांश देशांनी ‘ओमायक्रॉन’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लागू केलेले असतानाही ही स्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नवा व्हेरियंट जगासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला आहे. तथापि, नव्या व्हेरियंटमुळे अद्याप एकाही मृत्यूची पुष्टी झालेली नाही. नवा व्हेरियंट सर्वात आधी बोत्सवानात आढळला. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा या व्हेरियंटची सिक्वेन्सिंग करण्यात आली. नंतर तो हाँगकाँग, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, इस्रायल, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल आणि कॅनडात दाखल झालेला आहे. ब्रिटनने १८ वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:00 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here