कर्करोगाची भीती दूर करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयांत मोफत ओपीडी

0

चिपळूण : कॅन्सरविषयी भीती दूर करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर तसेच महाड व रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मोफत ओपीडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोफत ओपीडीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या गंभीर आजाराचे वेळीच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही अनोखी संकल्पना ऑन्को लाईफचे अध्यक्ष उदय देशमुख आणि लाईफ केअरचे संचालक डॉ. इसहाक खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. या माध्यमातून नागरिकांमधील कर्करोगाची असलेली भीती दूर करून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराबाबत तसेच आजाराबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दर सोमवारी गुहागर येथे कर्करुग्णांकरिता मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीमध्ये कॅन्सरतज्ज्ञ मोफत कर्करोग तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. याप्रमाणे दर गुरूवारी महाड ग्रामीण रुग्णालय येथे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू वीर हे मोफत कर्करोग तपासणी करत आहेत. तसेच मोफत ओपीडीचा लाभ चिपळूण, दापोली, ग्रामीण रुग्णालय येथे दर शनिवारी घेता येईल. मोफत ओपीडीचा लाभ मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथे दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी होईल. कॅन्सरतज्ज्ञ मोफत कर्करोग तपासणी आणि मार्गदर्शन करतील. या मोफत ओपीडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर आणि महाड, चिपळूण, गुहागर, दापोली आणि मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या रुग्णांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, अशा रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here