भरणे, तळे, घेरारसाळगड, निळवणे येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

0

खेड : तालुक्यातील भरणे, तळे, घेरारसाळगड, निळवणे भागातील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शनिवार, दि. २७ रोजी जामगे येथे शिवसेना नेते रामदास कदम व आ. योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली असून, प्रवेशकर्त्यामध्ये तरुण, युवती, महिला यांची संख्या मोठी असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी या भागात मागे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खेड तालुक्यातील जामगे येथे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी गर्दी केली होती. आ. योगेश कदम, शिवसेना तालुकाप्रमुख विजय जाधव, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, सुनील मोरे, अरविंद चव्हाण, शैलेश कदम, सभापती मानसी जगदाळे, महेश जगदाळे, रामचंद्र आईकर, उपसभापती जीवन आंब्रे, मोहन आंब्रे, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, विनय तोडणकर, बाळा पांचाळ, अल्पेश जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भरणे, तळे, घेरारसाळगड. निळवणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचे स्वागत शिवसेना नेते रामदास कदम व आ. योगेश कदम यांनी केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या राजकारणाला कंटाळलेले अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्यास उत्सुक असून, यापुढेदेखील असे पक्षप्रवेश होत राहतील, असा विश्वास यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 30-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here