आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन करा : खेड प्रांताधिकारी भाग्यश्री मोरे

0

मंडणगड : मंडणगड नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे पार्श्वभूमीवर मंडणगड नगर पंचायत सभागृहात २८ नोव्हेंबर रोजी आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन कसे करावे, याबाबत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका म्हणून खेडच्या प्रांताधिकारी भाग्यश्री मोरे यांची उपस्थित लाभली. यावेळी मुख्याधिकारी विनोद डवले, लिपीक मनोज मर्चडे यांची उपस्थिती लाभली. सुरुवातीस शहरातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना संबोधित करण्यात आले. या नंतर पत्रकारांना या विषयी माहिती देण्यात आली. कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेचे पालन कसे कारावे या वर प्रातांधिकारी भाग्यश्री मोरे यांनी मार्गदर्शन केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, नगर पंचायतीच्या वतीने निवडणूक कालवधीकरिता विविध विषयावर काम करणारी पथके तयार करण्यात आली आहेत. यात खडकी योजना पथक, आचारसंहिता नियमांचे पालन होत आहे अथवा नाही हे पहणारे पथक, तक्रार निवारण कक्ष, खर्च निरिक्षणाचे पथक यांचा समावेश आहे. आचार संहितेबरोबरच निवडणुकांचे कालवधीत कोव्हिड नियमांचे पालन होत आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी तयार करण्यात आलेले पथक न.पं.तर्फे नियमांचे पालन होत आहे अथवा नाही या वर लक्ष ठेवणार असून सर्व नियमांचे पालन व्हावे यासाठी आग्रही राहणार आहे. लिपीक मनोज मचडे यांची आचारसंहिता पालन पथकाचे प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:08 PM 01-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here