महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन एक्झिक्युटिव्ह कमिटी मेम्बर व मुंबई झोनल सचिवपदी मंदार सावंत यांची निवड

0

रत्नागिरी : महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार वार दिनांक 28/11/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता हॉटेल महाराजा, कोहिनुर कॉम्प्लेक्स, वेस्टन एक्सप्रेस हायवे, रावळपाडा समोर, दहिसर पूर्व, मुंबई-68 येथे संपन्न झाली. पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार नूतन कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची निवड करणे या विषयानुसार रत्नागिरी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सदस्य श्री. मंदार सावंत यांची महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन एक्झिक्युटिव्ह कमिटी मेम्बर व झोनल सेक्रेटरी ऑफ मुंबई अशी निवड करण्यात आली. मुंबई विभागाच्या मध्ये मुंबई सब, मुंबई सिटी, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरी असे सहा जिल्हे येतात. या सहा जिल्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या सर्व वयोगटाच्या निवडचाचणी नियोजनाची व स्पर्धेची जबाबदारी असते. मंदार सावंत हे गेली 22 वर्ष रत्नागिरीतील नामांकित शाळा फाटक हायस्कुल मध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी अनेक नामवंत व्हॉलीबॉल खेळाडू घडवलेले आहेत. तसेच त्यांना शासनाचा जिल्हा गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. अशा रत्नागिरीतील नामवंत व्हॉलीबॉल खेळाडूला मुंबई झोनल सचिव पदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमी आनंदी झाले आहेत. सर्व स्तरातून मंदार सावंत यांचे अभिनंदन होत आहे. मंदार सावंत यांचे प्रेरणास्थान मा. श्री. रविकिरण रेडीज (रत्नागिरी व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन उपाध्यक्ष) यांचे आशिर्वाद सतत त्यांच्या पाठीशी आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:57 PM 01-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here