रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशकडून महिला पैलवानास मदतीचा हात

0

रत्नागिरी : स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या महिला पैलवानास वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक मदत करून रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनने पाठबळ दिले आहे. तीन हजार रूपयाचा धनादेश व दोन हजार रूपयांची वैयक्तिक अशा स्वरूपात मदत केली आहे. सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेदरम्यान कु. धनश्री शेलार या होतकरू महिला पैलवानाच्या हाताला दुखापत झाली होती. तिच्या वैद्यकीय खर्चासाठी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना समजताच तातडीने मदत करण्याचे जाहीर केले होते. मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी  असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, प्रमुख कार्यवाह सदानंद जोशी, उपाध्यक्ष संतोष कदम , अमित विलणकर आणि आनंद तापेकर यांनी कुमारी धनश्री शेलार हिच्या घरी जावून मदतीचा धनादेश व रोख रक्कम सुपूर्त केली. तीन हजार रूपयाचा धनादेश व असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष कदम यांचेकडून वैयक्तिक दोन हजार रूपये असे मदतीचे स्वरूप होते. 1974 साली स्थापन झालेली रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन रत्नागिरी जिल्ह्यातील कुस्तीच्या संवर्धानासाठी नेहमीच तत्पर असते. सर्व वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे नियोजन, निरनिराळ्या शिबीरांचे आयोजन, होतकरू पैलवानांना मदत अशा प्रकारच्या अनेक उपक्रम असोसिएशन कडून राबवले जातात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:57 PM 01-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here