सौरभ मलुष्टे पुरस्कृत कोकणातील पहिली ‘टिकटॉक’ स्पर्धा संपन्न

0

रत्नागिरी : कोकणातील पहिली ‘टिकटॉक’ स्पर्धा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील संसारे उद्यान येथे पार पडली. उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या संकल्पनेतून हि अभिनव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला तरुणाईकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी ४५० व्हिडीओ पाठवले. या आलेल्या व्हिडीओ मधून ऐश्वर्या सुर्वे हिने ‘टिकटॉक’ क्वीनचा तर सोनू परब याने ‘टिकटॉक’ किंगचा मान पटकावला. त्यांना २५०० व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिद्धेश सांडीम याने तर तृतीय क्रमांक सेजल सचिन मयेकर हिने पटकावला. त्यांना अनुक्रमे १५०० रु. १००० रु. व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याशिवाय बारा स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

HTML tutorial

सौरभ मलुष्टे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. ‘टिकटॉक’ च्या माध्यमातून चांगले संदेश देणारे व्हिडीओ स्पर्धकांनी पाठवले होते. हे व्हिडीओ मोठ्या स्क्रीन वर पहात असतांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत होती. संसारे उद्यान मध्ये प्रत्येक व्हिडिओ सोबत तरुणाईचा जल्लोष पहायला मिळत होता. रत्नागिरी खबरदारच्या वुमेन्स कमिटीने याचे आयोजिन केले होते तर सौरभ मलुष्टे यांनी या स्पर्धेसाठी प्रायोजकत्व दिले होते. सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी सौरभ मलुष्टे, पत्रकार आनंद तापेकर, प्रणील पाटील, प्रशांत पवार, राजेश शेळके, अमोल कलये आदी उपस्थित होते.

‘टिकटॉक’ स्पर्धेत अफनान बांगी, अश्विनी चव्हाण, नीलिमा कांबळे, अभिलाश पिलणकर, जान्हवी सप्रे, शुभम रसाळ, तुषार साळुंखे, धनश्री पाटील, सुरज पांचाळ, मंदार वैद्य, ऐश्वर्या सालम, आनंद कीर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा पोलीस वाहतूक निरीक्षक अनिल विभूते, एलसीबी चे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उद्योजक सौरभ मलुष्टे, बंटी पाथरे, ब्रिजेश साळवी, प्राध्यापक आनंद आंबेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here