स्वयंभू काशिविश्‍वेश्‍वर मंदिरात २१ रोजी महाशिवरात्र यात्रा

0

रत्नागिरी (वार्ताहर)- शहरातील श्री स्वयंभू काशिविश्‍वेश्‍वर देवस्थान राजिवडाच्यावतीने २१ रोजी महाशिवरात्री उत्सवानिमित्त ‘महाशिवरात्र यात्रा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २१ रोजी पहाटे ५ वा. श्री देव विश्‍वेश्‍वराची सिंहासनावर स्थापना स.१० ते रात्रौ १० दरम्यान विविध भजने, रात्रौ १२ वा.पालखी दिंडी कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे २४ फेब्रुवारी रोजी स.९ ते ११ दरम्यान मंदिरामध्ये लघुरुद्र होणार असून दु.१२ ते ३ दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष कैलास विलणकर, उपाध्यक्ष प्रवीण वायंगणकर, कार्यवाह देवेंद्र झापडेकर, खजिनदार पंढरीनाथ पावसकर यांनी केले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here