रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी, बागायतदार धास्तावले

0

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्याप्रमाणे जिल्ह्यात सातत्याने पाऊस बरसत आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत. पावसामुळे मोहोर गळण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात बुधवारी पहाटेपासून पावासाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात ३ डिसेंबरपर्यंत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा इशारा आयएमडीनं दिला आहे. महाराष्ट्रात आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धूळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here