सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पारकर, व्हिक्टर डान्टस, बाबा आंगणे, मुरलीधर नाईक, समीर हडकर, बंडू ठाकूर, अशोक नांदोस्कर, भास्कर राणे, संकेत नाईक, भूषण परुळेकर, प्रशांत वनस्कर, श्रीकांत राणे आदी उपस्थित होते. सतीश सावंत हे विद्यमान जिल्हा बँक अध्यक्ष असून त्यांनी जिल्हा बँकेचा कारभार यशस्वीरित्या चालविला आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून येऊन सहकार क्षेत्रातून सिंधुदुर्ग बँकेला विकासाच्या वाटेने घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सतीश सावंत सहकार क्षेत्रात सक्रिय कार्यरत असल्याने त्यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:44 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here