‘सद्यस्थितीत लोकं भाजपवर नाराज; २०२४ ला देशात मोदी सरकार राहणार नाही’

0

पुणे : पुण्यात औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारची विकासकामे, शरद पवार यांचे कौतुक आणि भाजपवर टीका अशा विवीध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘आजच्या परिस्थितीत जास्तीत जास्त लोकं भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे 2024 ला या देशात मोदी सरकार राहणार नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. मलिक म्हणाले, पुलवामात मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कुठून आलं याचा तपास अजून लागला नाही. यासारख्या घटनांचा फायदा घेऊनच भाजप सत्तेवर आला आहे. भाजपची देशात सात वर्षापासून सत्ता असताना दहशतवाद अजूनही संपला नाही, चीन सारखे देश या देशात नवीन गाव उभ करतात. 2019 च्या निवडणूकीत भाजपने पुलवामा घटनेचा राजकीय फायदा उचलला असा आरोप करत त्याच्या आधारावरच त्यांच्या सर्व जागा निवडून आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आजच्या परिस्थितीत जास्तीत जास्त लोकं भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे 2024 ला या देशात मोदी सरकार राहणार नाही हे स्पष्ट आहे. कृषी कायदे रद्द झाल्यानंतर सरकार देशासमोर झुकते हे समोर आल आहे. देशात परिवर्तन अटळ असल्याचे ते म्हणाले आहेत.

”देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीए मध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाला आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतला आहे. ममतादीदीसोबत त्याच विषयावर चर्चा झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here