दिव्यांग कर्मचारी संघटनेचे पुरस्कार जाहीर

0

◼️ ४ डिसेंबरला ना. उदय सामंत यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रत्नागिरी व जिल्हा दिव्यांग समन्वय समिती यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या दिव्यांग शक्ती व दिव्यांग सेवा गौरव पुरस्कारांची घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष साजरा न झालेला दिव्यांग दिवस यंदा मोठ्या उत्साहात दि. ३ व ४ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे. दि. ४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेतील कै. श्यामराव पेजे सभागृह येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या सोहळ्याला आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, समाज कल्याण सभापती परशुराम कदम, संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, कुणबी समाज उन्नती संघाचे चंद्रकांत करंबेळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, समाजकल्याण अधिकारी सुनील चिकणे, शिक्षण अधिकारी निशादेवी बंडगर उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि. ४ डिसेंबरला सकाळी ११ ते ५ या वेळी मध्ये पुरस्कार वितरण सोहळा व दिव्यांगाचे हक्क व सवलती यावर कार्यशाळा संपन्न होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करीत जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या उत्साहात सहभागी होणार असल्याची माहिती समन्वय समिती जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी दिली आहे. पुरस्कार निवड समिती अध्यक्ष अनंत गव्हाळे व रवींद्र घाणेकर यांनी यावर्षी पुरस्कारांची घोषणा केली. दिव्यांग शक्ती पुरस्कर सादिक नाकाडे रत्नागिरी, सुरेंद्र चिवेलकर गुहागर, सुनील मुकणाक गुहागर, मंगेश महाडिक दापोली, पत्रकार विजय पाडावे यांना दिव्यांग मित्र पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डॉ. नितीन चौके रत्नागिरी, समिधा कुल्ये, राजापूर ,रवींद्र निवळे लांजा, सुभाष वाघमारे राजापूर, चेतना धारिया खेड, संदीप राजेशिर्के चिपळूण, लता चौगुले राजापूर यांना यावर्षीचा दिव्यांग शक्ती पुरस्कार घोषित झाला आहे तर संस्थांसाठी दिला जाणारा दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार यावर्षी लांजा तालुका अपंग संस्था लांजा, धनगर समाज संस्था राजापूर, अपंग सेवा संघ चिपळूण यांना घोषित झाला आहे. दि.४ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचारी व सर्व सामान्य दिव्यांग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष विलास गोरे, सचिव आनंद त्रिपाठी, उपाध्यक्ष अनंत गवाले, कार्याध्यक्ष अशोक जायभाय, कार्यालयीन सचिव अनंत पेठकर, समन्वय समिती कार्याध्यक्ष विजय कदम, सचिव अमित आदवडे उपाध्यक्ष अशोक भुस्कुटे, गौतम सावंत यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:49 PM 02-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here