रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. कोव्हिड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून माहे डिसेंबर २०२१ चा लोकशाही दिन ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्षात न होता दूरचित्रवाणी (व्हिडीओ कॉन्फरन्स) च्या माध्यमातून दुपारी १ ते २ वाजता या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहन दूरचित्रवाणी (व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे) लोकशाही दिनामध्ये सहभागी होता येईल. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात. अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज १५ दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. विहीत नमुन्यामध्ये तसेच विहीत मुदतीत प्राप्त न झालेले अर्ज जिल्हा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 03-Dec-21