सिंधुदुर्ग: परदेशातून येणाऱ्या प्रवाश्यांची विमानतळावर आरटीपीसीआर : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

0

सिंधुदुर्ग : ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून येणारे आणि भारत सरकारद्वारे वेळोवेळी घोषित केलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावर उतरून पुढे विमानान प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकणार आहेत. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर उतरणाऱ्या अशा प्रवाश्यांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करुन अशा प्रवाश्यांची माहिती आरोग्य विभागास कळविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. त्याच बरोबर अशा प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि या प्रवाश्यांची आरटीपीसीआर चाचणी 2, 4 आणि 7 व्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास, प्रवाशाला रुग्णालयात हलवण्यात यावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास, प्रवाशांना आणखी 7 दिवस होम क्वारंटाईन करण्यात याव, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत. या आदेशात म्हटले की, कोविड -१९ विषाणूचा ओमीक्रॉन प्रकार (Variant) दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांमध्ये आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले असून त्या पार्श्वभूमीवर, शासनाने हवाई वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध लावलेले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड -१९ विषाणूच्या ओमीक्रॉन प्रकाराचा (Variant) प्रसार रोखण्यासाठी, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग, याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी खालील अटी/निर्बंध लागू करीत आहे. या कार्यालयाकडून कोविड – १९ चा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या मार्गदर्शक सूचना, तसेच भविष्यात कोविड -१९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केले जाणारे आदेश किमान निर्बंध म्हणून काम करतील. ओमीक्रॉन विषाणूचा प्रसार असलेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवाश्यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य राहील आणि आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा प्रवाश्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात यावे. आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात यावे. याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.सिंधुदुर्ग व जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी समन्वयाने करावी.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून महाराष्ट्र राज्याअंर्तगत विमान प्रवास करण्यासाठी प्रवाशाकडे लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या वेळेच्या ४८ तास अगोदरचे निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल घेणे अनिवार्य राहील.सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यांतील प्रवाशांच्या बाबतीत, प्रवासाच्या वेळेच्या 48 तास अगोदरचे निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल घेणे अनिवार्य राहील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:44 PM 03-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here