राज्यांनी ऑक्सिजन अभावी झालेल्या मृतांची आकडेवारी दिली नाही; केंद्राचा राज्यांवर निशाणा

0

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंवर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरुन मोठं राजकारण करण्यात आलं, दिल्लीच्या रस्त्यांवर ऑक्सिजनचे टॅन्कर फिरत राहिले पण त्याचा राज्याकडून त्याचा वापर करण्यात आला नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ऑक्सिजनच्या अभावी झालेल्या मृत्यूंची संख्या पंजाब व्यतिरिक्त कोणत्याही राज्याने दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ते आज लोकसभेमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय म्हणाले की, “दिल्लीच्या रस्त्यांवर ऑक्सिजनचे टॅन्कर फिरत राहिले पण त्याचा वापर करण्यात आला नाही. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितलं की राज्यांनी कोरोनामुळे झालेल्या मृतांची आकडेवारी द्यावी, ती लपवू नये. पण राज्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. काही राज्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी केली.” देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत आज आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय उत्तर दिलं. गुरुवारी सुरु झालेल्या कोरोनावरील चर्चेत आरोग्यमंत्री आज भूमिका मांडली. एकीकडे राज्यासह देशातलं आरोग्य प्रशासन सतर्क झालंय. त्यात लोकसभेतही कालपासून ओमायक्रॉनच्या धर्तीवर चर्चा सुरु आहे. त्यात काल महाविकासआघाडीच्या खासदारांनी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारवर ऑक्सिजन उपलब्धतेवरुन केलेल्या टीकेला आज आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय.

कोरोना काळात ऑक्सिजनअभावी देशात किती मृत्यू झाले हा प्रश्न आजही अनुत्तरित राहिला. केवळ पंजाब सरकारनं ऑक्सिजन अभावी चार संशयित मृत्यू झाल्याची कबुली दिली, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली. केंद्रानं राज्यांना तीनवेळा स्मरणपत्र पाठवली. 19 राज्यांनी दिलेल्या उत्तरात केवळ पंजाबनं 4 मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याची कबुली दिली, असं त्यांनी सांगितलं. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारसह विरोधकांवर निशाणा साधला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:18 PM 03-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here