मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेकडून नेत्रतपासणी शिबीर

0

रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेकडून सर्व पत्रकारांसाठी नंदादीप आय हॉस्पीटलमध्ये नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील बहुतांश पत्रकारांनी शिबीराचा लाभ घेतला. मराठी पत्रकार परिषद वर्षभर विविध उपक्रम घेत असते, 3 डिसेंबर मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय दोन वषार्र्ंपूर्वी परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी घेतला. त्यामुळे गेल्या 3 वर्षापासून पत्रकारांसाठी हा दिवस आरोग्य तपासणी करुन साजरा केला जातो. नेहमी समाजातील घडामोडींचा लेखाजोखा मांडत असताना पत्रकार स्वत:च्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या आरोग्याच्या समस्यांकडे वेळीच लक्ष द्यावे, त्यांचे वेळेत उपचार व्हावेत या हेतूने या शिबीराचे एकाच दिवशी राज्यभर आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतही येथील नंदादीप आय हॉस्पीटलमध्ये नेत्र तपासणीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते, परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, सचिव जमीर खलिफे, सतीश पालकर, मुश्ताक खान, केतन पिलणकर आदी उपस्थित होते. तसेच शहरातील बहुतांश पत्रकारांनी डोळ्यांची तपासणी करुन घेतली. रत्नागिरी मराठी पत्रकारकडून नंदादीप आय हॉस्पीटलच्या डॉ.प्रिती राज व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 03-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here