जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मराठी भाषा समितीची स्थापना

0

रत्नागिरी : मराठी भाषेत शासकीय कामकाज करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर मराठी भाषा समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची मराठी भाषा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने १६ जुलै २०२१ च्या महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियमान्वये जनतेशी करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार आणि इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेत करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समतीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सदस्य असतील. नियुक्त करण्यात आलेले मराठी भाषा अधिकारी समितीचे सदस्य सचिव असतील. समितीमध्ये नामनिर्देशित अशासकीय सदस्यांमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख शिवराज गोपाळे, कोमसापच्या कार्याध्यक्ष नमिता कीर, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि मालगुंड येथील केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 04-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here