सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : १९ जागांसाठी एकूण ९१ अर्ज दाखल

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या नामनिर्देशन दाखल करण्याच्या काल शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी ३३ जणांनी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांचे कडे उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी १९ जागांसाठी एकूण ९१ अर्ज दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी समाप्त झाली. नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपप्रणीत पॅनल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी ३३ तर एकूण ९१ अर्ज दाखल केले आहेत. सोमवार दिनांक ६ रोजी यांची छाननी होणार आहे. तर, छाननीत वैध झालेल्या उर्वरित उमेदवारांना अर्ज मागे घेण्यात मुदत २१ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 04-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here