साखरपा येथील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू

0

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अनंत विष्णू जाधव असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत अमित जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अनंत जाधव यांच्या पायाला ३० नोव्हेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. या घटनेची नोंद गुरुवारी देवरूख पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक वैभव कांबळे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:27 PM 04-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here