मिरजोळे येथील शेतघरातून १७ हजारांचे सामान चोरीला

0

रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथील शेतघरातून सुमारे १७ हजार १०० रुपयांचे सामान चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना १ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० ते २ डिसेंबर रोजी दुपारी ११.३० वा. सुमारास घडली. याबाबत रमेश तुकाराम भाटकर (६३, रा.टीआरपी एसटी वर्कशॉपच्या मागे रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचे मिरजोळे येथील शेतघराच्या दरवाजा कुलूप तोडून अज्ञाताने एक ग्रास कटर एक फवारणी पंप, चार फवारण पाईप आणि एक कुन्हाड असा एकूण १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अधिक तपार शहर पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 04-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here