भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन

0

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘आपण राहत असलेल्या विश्वा(विषयी वडिलधार्या व्यक्तीला संदेश’ असा पत्रलेखनाचा विषय आहे. येत्या ३१ मार्च २०२० पर्यंत ज्यांचे वय 15 वर्षांपर्यंत आहे, अशी मुले यात भाग घेऊ शकतात. मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत पत्र लिहिता येईल. शब्दमर्यादा ८०० पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेने प्रमाणित केलेले असावे. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी आहे. ही स्पर्धा येत्या १ मार्च रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत होईल. पहिल्या चार क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये, दोन हजार रुपये आणि एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येकी एका उत्कृष्ट पत्रासाठी 14 सर्कल स्तरावरील तीन बक्षीसपात्र पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर तेथे क्रमांक काढण्यात येतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक एम. नरसिंह स्वामी यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here