आंबोली सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात एस.एस.बी.साठी निवड

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स-सर्व्हिसमेन असोसिएशन, सिंधुदुर्ग संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, ओबोली ही नामांकित शाळा सलग १९ वर्षे शिस्तप्रिय, सक्षम, साहसी विद्यार्थी घडविण्याचे अविरत कार्य करत आहे. या यशात अजून भर घालत स्कूलच्या तीन यशस्वी विद्यार्थ्यांची बारावी नंतरच्या technical entry च्या (SSB) मुलाखतीसाठी निवड झाली आहे. सैनिक स्कूल मध्ये असताना संपादित केलेल्या ज्ञानाच्या आधारे आणि सैन्य दलात उच्च पदस्थ अधिकारी बनण्याचे ध्येय घेवून ज्ञानार्जन करणारे सैनिक स्कूलचे विदयार्थी इयत्ता १२वी नंतर ही आपल्या ध्येयासाठी प्रयत्नशील राहतात. भारत सरकारचा रक्षा मंत्रालया मार्फत सेवा निवड समिती (SSB) दवारे देशभरातून उच्च पदस्थ अधिकारी निवड करण्यासाठी मुलाखत घेतली जाते. हे विदयार्थी थेट SSB साठी निवडले जातात. यामध्ये सैनिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून स्कूलच्या यशात आणखीन भर घातली आहे. कॅडेट. संचित प्रभूखानोलकर, कैडेट: संग्राम मोरे आणि कॅडेट. विशांत दळवी हे SSB साठी डिसेंबर महिन्यात आमंत्रित केले जातील.
या यशस्वी विदयार्थ्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष पी. एफ.डान्टस, सचिव सुनिल राऊळ, शाळेचे प्राचार्य. एस.टी. गावडे, कमाउंट कर्नल सुनिल सिन्हा, सर्व संचालक व सर्व शिक्षकांकडून केले जात आहे. तसेच SSB साठी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांकडून मार्गदर्शन लाभले. या सैनिक स्कूलचे आतापर्यंत 13 विदयार्थी NDA परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच आज पर्यंत 20 विद्यार्थ्यांची SSB साठी निवड झाली आहे. तर लेफ्टनेट रोहित अर्जुन शिंदे हा देश सेवा बजावत आहे. आतापर्यंत १९ विदयार्थी सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी देश सेवा बजावत आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरामधून शाळेचे अभिनंदन होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 04-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here