”रिफायनरी प्रकल्पासंबंधित लोकांचे म्हणणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडण्यासाठी त्यांची भेट घालून देण्याची खासदार, आमदारांकडे मागणी केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा स्थितीमध्ये या भागातील जमीनमालकांना ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. यावेळी विभागप्रमुख म्हणून उपस्थित होतो. विकासात्मक प्रकल्पाचे समर्थन आणि स्वागत केले ही माझी चूक आहे का, त्यामुळे माझ्यावर कारवाई झाली असेल, तर ती चूक मी पुन्हा पुन्हा करेन”, अशी आक्रमक प्रतिक्रिया सागवे (ता. राजापूर) येथील शिवसेनेच्या विभागप्रमुखपदावरून उचलबांगडी झालेले राजा काजवे यांनी दिली.
