महाराष्ट्रातही ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव; राज्यभरात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 8 रुग्ण

0

मुंबई : जगभराची झोप उडवणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे., अशी माहिती नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या (एनसीएल) अहवालात स्पष्ट झालं आहे.
24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यासोबतच पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता. 29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे. पण कोरोनाचा नवा व्हेरियंटने पुण्यात शिरकाव केल्यामुळे पुण्याच्या चिंतेत भर टाकली आहे.
चार डिसेंबरपर्यंत मुंबई विमानतळावर हाय रिस्क देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आर.टी.पी.सी.आर तपासणी करण्यात आली. तर इतर देशांमधून आलेल्या 344 प्रवाशांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. विमानतळावर एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आठ प्रवाशी कोरोनाबाधित आढळले आहेत. या सर्वांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात एक नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 06-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here