स्पर्धा परीक्षा: नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया सुरू

0

नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकारने सर्व प्रशासकीय विभागातील ब आणि क गटातील पदभरतीची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या महापरीक्षा पोर्टलमध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळा असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. तसेच सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सततच्या तक्रारीनंतर गुरुवार, २० फेब्रुवारीला हा मोठा निर्णय घेऊन नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here