शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची येत्या रविवारी बैठक

0

जिल्ह्यातील शिवसेनेच्या कामाचा उत्साह कायम राहावा, यासाठी येत्या रविवारी (दि. २३) जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. असलेला जनाधार कमी होऊ नये यासाठी या बैठकीच्या माध्यमातून सेना पदाधिकाऱ्यांना ताकद दिली जाणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यात आता शिवसेनेची राज्यात सत्ता आली आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याने राजकीय घडामोडींमधून शिवसेना कमकुवत होऊ नये यासाठी बऱ्याच महिन्यांमध्ये न झालेली जिल्हाकार्यकारिणीची बैठक २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हातखंबा येथील सिद्धगिरी हॉलमध्ये सकाळी ११ वाजता ही बैठक होणार असल्याचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितले. जिल्हा कार्यकारिणीच्या या बैठकीला पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना निमंत्रित करण्यात आले आहे. खा. विनायक राऊत, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, आ. राजन साळवी, आ. भास्कर जाधव, आ. योगेश कदम, शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख, जि. प. अध्यक्ष रोहन बने, शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवींसह इतर नगरसेवक, सभापती व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here