टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, २०१५ पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे. टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त ३० विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी ४७ देश आणि विभागांचा समावेश होता. एकूण ५३३ विद्यापीठांत एकूण ५६ भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते. टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले. ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले. २०१९ मध्ये हे विद्यापीठ १४१ व्या स्थानी होते. २०१९ च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मापनात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् आॅफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे. या विद्यापीठांनी अनेक बदल स्वीकारून पहिल्या १०० च्या यादीत स्थान मिळवावे, अशी सरकारची इच्छा असते. त्यात विदेशी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आणि जगातील उत्कृष्ट विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आदीचा समावेश आहे.
