चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाने येथील अविनाश उर्फ पप्या चव्हाण व त्याचा मावसभाऊ प्रशांत प्रकाश विचारे यांनी दि. २५ जुलै रोजी महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मार्गताम्हाने येथील पाटीदार सेंटर येथे प्रशांत विचारे यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या पडवीत राहत असलेल्या महिलेला अविनाश चव्हाण यांनी प्रशांत विचारे यांच्यासोबत लग्नाबाबत विचारणा केली व या दोघांची तिची छेडछाड केली. त्यामुळे सदर महिलेने या दोघांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
