चिपळूण : बाजारपेठेतील पद्माकर मोहिरे यांच्या मालकीच्या दुकानात नवेद तुकाराम मोहिरे, विकास हरी मांडवेकर व अन्य वीस ते पंचवीस अनोळखी इसमांनी दुकानाचे काम बंद कर असे सांगून आपल्याला मारहाण केल्याची तक्रार सागर प्रकाश रानडे (३२, रा. पिंपळगाव दौंड, जि. पुणे) याने चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रानडे यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील जुने मोहिरे कॉम्प्लेक्समधील पद्माकर मोहिरे यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यात दुकानाचे काम करीत असताना संशयित नवेद तुकाराम मोहिरे, विकास हरी मांडवेकर, नवेद मोहिरे यांचा मुलगा व सोबत वीस ते पंचवीस व्यक्ती दुकान गाळ्यात आल्या व संबंधितांनी बेकायदा जमाव करून तक्रारदार रानडे व साक्षीदार संकेत बेद्रे यांना दुकानाचे काम ताबडतोब बंद करा. बाहेरून येऊन काम करायचे नाही. कोर्टाचा स्टे आहे, असे सांगत दमदाटी करून शिवीगाळही केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 06-Dec-21