चिपळूण : तालुक्यातील कापरे आरोग्य केंद्रात मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन उद्या मंगळवारी (दि. ७ डिसेंबर) करण्यात आले आहे. लोकजागृती फाउंडेशन आणि चिपळूणच्या नॅब आय हॉस्पिटलतर्फे हे शिबिर होणार आहे. कापरे आरोग्य केंद्रांतर्गत गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी करून मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरासाठी जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मीनल काणेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ. माने, डॉ. यादव यांचे मार्गदर्शन लाभत आले. नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकजागृती फाउंडेशनचे कार्याध्यक्ष तथा आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 06-Dec-21