रत्नागिरी जिल्ह्यात ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा संसर्ग नाही

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हॅरिएंटचा संसर्ग रत्नागिरी जिल्ह्यात कोणालाही झालेला नसल्याचे सोमवारी (६ डिसेंबर) जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात सोमवारी एकही नवा कोरोनाबाधित आढळला नसून, तीन जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३२वर आली आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर २०२१ पासून रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून २१२ नागरिक आले असून, त्यापैकी ११४ नागरिकांचा शोध घेऊन पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५१ नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. परदेशातून जिल्ह्यात आलेल्या कोणालाही कोविड संसर्ग झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. २८ नोव्हेंबरपासून परदेशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – मंडणगड १०, दापोली ३१, खेड ४२, गुहागर ३, चिपळूण ४७, संगमेश्वर १६, रत्नागिरी ५६, लांजा ३, राजापूर ४
दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग जिल्ह्यात आढळला नसला, तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. अध्यक्ष विक्रांत बने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जि. प. आरोग्य सभापती उदय बने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ६ डिसेंबर) आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०१ आहे. आज तीन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८० एवढी आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार दि. ५ डिसेंबरला करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ४ सत्रे झाली. त्यात १५० जणांनी पहिला, तर १२९ जणांनी दुसरा डोस घेतला. रविवारी एकूण २७९ जणांचे लसीकरण झाले. आतापर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ६८ हजार २४२ जणांचा पहिला, तर ५ लाख ८ हजार ४६२ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. एकूण १४ लाख ७६ हजार ७०४ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:41 AM 07-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here