रत्नागिरी जिल्हा परिषदेचे कामकाज होणार डिजिटल

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद कामकाज आणि सर्व आदेशांची माहिती आता एका क्लिकवर नागरिकांना पाहता येणार आहे. एखाद्या कर्मचारी, अधिकारी पदोन्नती कार्यवाही झाली तरी त्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड होणार असून, संपूर्ण कामकाजाचे डिजिटायझेशन करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आहे. हा उपक्रम राबाविणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचा जिल्हा ठरणार आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे मार्गदर्शन घेण्यात आल्याची माहिती जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी परिक्षित यादव यांनी यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेला उत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे डिजिटायजेशनमध्ये अहमदनगर जिल्हा राज्यातील पहिला ठरला आहे, यामध्ये परिक्षित यादव यांचे मोठे योगदान आहे. आता रत्नागिरी जिल्हा परिषदेतही याची अंमलबजावणी होणार असून, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि पूर्ण टीमने याचे नियोजन केले असून यासाठी परिक्षित यादव विशेष प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात डीजिटाझेशन अधिक महत्व प्राप्त झाले आहे. प्रशासकीय कामकाजाची माहिती एका क्लिकवर तेही सर्वांना पाहायला मिळणार असेल तर कामाची पारदर्शकताही अधिक राहते. जिल्हा परिषदेत दररोज अनेक आदेश पारित केले जात असतात तसेच परिपत्रकांची अंमलबजावणीही होत असते. यापुढे ती ऑनलाईनही दिसणार आहे. यामुळे एक वेगळा डाटा संगणकीकरणाच्या माध्यमातून सर्वांसमोर येईल. याचा फायदा ई-कामकाजासाठी होईल, असा विश्वासही परिक्षित यादव यांनी व्यक्त केला आहे. याची अंमलबजावणी प्रक्रिया सध्या सुरु आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:29 PM 07-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here