दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे बेदरकारपणे वाहन चालवून समोरील दुचाकीला मागील बाजूने धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा.सुमारास घडली होती. या अपघातात रोहिदास मोहिते (४४, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) आणि लक्ष्मीकांत पाडाळे (५०, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी रोहिदास मोहिते आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एएफ-५४११) वरुन लक्ष्मीकांत पाडाळे यांना सोबत घेऊन देवरुख ते रत्नागिरी असे येत असताना हा अपघात झाला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:08 PM 07-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here