‘ओमिक्रॉन’ला अटकाव करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज; 11 ऑक्सिजन युनीटसह 3 हजार 48 बेड उपलब्ध

0

रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या उत्परिवर्तीत विषाणूला अटकाव करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव करण्याचा वेग अधिक असल्याने त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने 11 ऑक्सिजन युनीटसह 3 हजार 48 बेड उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत. तांत्रिक बाबींची पुर्तता करण्यात आली आहे. मात्र वैद्यकिय अधिकारी, कर्मचार्‍यांसह 250 जणांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी 4 कोटी रु.चा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी दिली. मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात सुरु आहे. मात्र कोरोनाचा जगभरातील मुक्काम वाढत असल्याने त्याचे व्हेरिएंट निर्माण होत आहे. पहिल्या कोरोना विषाणूनंतर डेल्टाप्लसने जगभरात हाहाकार माजवला होता. रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या लाटे पेक्षा दुसर्‍या लाटेचा तडाखा सर्वाधिक बसला होता. त्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. पाहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर आरोग्य यंत्रणाना सावरत असताना दुसर्‍या लाटेचा तडाखा आरोग्य यंत्रणेला चांगलाचा बसला होता. त्याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. जिल्हात सध्या ऑक्सिजन निर्मीतीची 11 युनीट कार्यरत आहे. दुसर्‍या लाटेच्या सुरवातीला जिल्ह्यात ऑक्सिजनच्या तुटवडा जणवला होता.त्यानंतर राज्य, केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युनीट उभारण्यात आली आहेत. ती पुन्हा कार्यरत करण्याची तयारी आरोग्य विभागाने सुरु केली आहे. दुसर्‍या लाटेत दि.17 मे रोजी एकाच दिवशी तब्बल 27 मेट्रीक टन ऑक्सिजन लागला होता. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक ऑक्सिजनच्या दिडपट ऑक्सिजन उपलब्ध करुन ठेवण्यात आला आहे. सध्या पीएसए वर्गातील 11 युनीटमधून 8.35 मेट्रीक टन, एल.एम.ओ वर्गातील एका युनीटमधून 92.47  मेट्रीक टन, ऑक्सिजन सिलेंडरमधील 264 बी टाईपमधून 0.51  मेट्रीक टन, 1168 डी टाईपमधून 10.61  मेट्रीक टन, ऑक्सिजन कान्सनट्रेटर्समधून 5.07 असे एकूण 117.21  मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. तर  आयसीयुमध्ये व्हेंटीलेटरचे 244 बेड, आयसीयुमध्ये नॉनव्हेंटीलेटरचे 244 बेड, ऑक्सिजन असलेले 1036 बेड तर ऑक्सिजन नसलेले 1524 बेड जिल्ह्यातील विविध शासकिय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यासाठी 63.84 मेट्रीक टन ऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता असून ऑक्सिजनच्या आवश्यक साठा सध्या उपलब्ध असल्याचे डा. फुले यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 07-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here