तिकीट वाटपाचे सर्व अधिकार अनिल परबांकडे; रामदास कदमांना ऑडीओ क्लिप प्रकरण भोवले ?

0

रत्नागिरी : रत्नागिरीतील मंडणगड, दापोली नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून शिवसेनेने या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सोपवली आहे. विधानपरिषद निवडणुकीची उमदेवारी डावलल्यानंतर मंडणगड आणि दापोलीतील निवडणुकीची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे देणं हा रामदास कदम यांच्यासाठी धक्का मानलं जातं आहे. रामदास कदम यांना ऑडिओ क्लिप प्रकरण पुन्हा भोवल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या दोन नगरपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजलंय. या दोन्ही नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे. दापोली आणि मंडणगड या नगपंचायतीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना आमदार योगेश कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सर्व मटेरीयल हे शिवसेनेचेच नेते रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप मनसेचे स्थानिक नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. रत्नागिरी खबरदार या क्लिपची पुष्टी करत नाही. पण ज्या दोन ते तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात त्यात, परबांच्याविरोधात जी ईडीनं कारवाई केली त्यावर कदम वाह वाह म्हणताना दिसत आहेत. एवढंच नाही तर प्रसाद कर्वे हा रामदास कदमांचा कार्यकर्ता एकाच वेळेस कदम आणि सोमय्यांच्या संपर्कात होता असंही दिसतं होतं. मात्र, या ऑडिओ क्लिपशी आपला संबंध नसल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here