मुरुगवाडा क्रिकेट क्लब आयोजित जय भैरव चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

0

मुरुगवाडा क्रिकेट क्लब आयोजित नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल एक ग्रामपंचायत जय भैरव चषक २०२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे जय भैरव देवस्थान मुरुगवाडाचे अध्यक्ष रामभाऊ शिरधनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी राहुल पिलणकर, रवींद्र मयेकर, प्रसन्न मयेकर, भैय्या भाटकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत विजेत्या संघाला १ लाख रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला ५० हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला बाळा मयेकर यांच्याकडून दुचाकी पारितोषिक देण्यात येईल. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण व प्रत्येक सामन्यात सामनावीर खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात येईल. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप व चषक, सर्वाधिक फलंदाज बाद करणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here