उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवरील उपचार व पाठपुरावा करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यात येणारे ‘सिम्पल’ अॅप आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोकणातील रत्नागिरी, ठाणे, पालघरसह कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात वापरण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांची देखील नोंद ठेवण्यात येणार आहे. या संदर्भातला पथदर्शी प्रकल्प अलिकडेच वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यात आला. आता ही सुविधा कोकणातील आरोग्य केंद्रातही अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
