रत्नागिरी जिल्ह्यात महामार्ग भूसंपादन लवादाची सुनावणी

0

रत्नागिरी : केंद्र शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ (जुना १७) साठीच्या आवश्यक असलेल्या भूसंपादन पुनर्वसन आणि आनुषंगिक कामासाठी महामार्ग अधिनियम १९५६ मधील तरतुनुसार नेमण्यात यावयाच्या लवादासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी सुनावणी केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या पत्रानुसार खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याकरिता रत्नागिरीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांची लवाद म्हणून नियुक्ती केली आहे. कोरोना संक्रमणाविषयी शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार सुनावणीची कार्यवाही काही कालावधीकरिता स्थगित करण्यात आली होती. आता ही सुनावणीची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. सुनावणीच्यावेळी उपस्थित राहताना करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

लवादाच्या सुनावणीचे वेळापत्रक असे – चिपळूण तालुका- १५ डिसेंबर २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्या कार्यालयात दुपारी १२ वाजल्यापासून चिपळूण तालुक्यातील सर्व अपिलांवर सुनावणी.
खेड तालुका- १७ डिसेंबर २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी, खेड यांच्या कार्यालयात दुपारी १२ वाजल्यापासून खेड तालुक्यातील सर्व अपील..
संगमेश्वर तालुका – २२ डिसेंबर २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्या कार्यालयात दुपारी १२ पासून संगमेश्वर तालुक्यातील सर्व अपील.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 08-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here