रत्नागिरी : सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी धामणसे (ता. रत्नागिरी) या गावाची निवड केली आहे. या योजनेअंतर्गत धामणसे येथे विविध योजना राबविण्यात येणार आहेत. त्या कामांचा आराखडा तयार करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) दुपारी अडीच वाजता धामणसे येथील डी. एम. जोशी सभागृहात नियोजन सभा आयोजित केली आहे. ग्रामस्थांनी आणि सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रत्नागिरीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
