ऊटीमधील दुर्घटनाग्रस्त हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधील चार जणांचा मृत्यू

0

चेन्नई : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ वेलिंग्टन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये हवाईदलाचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. या हेलिकॉप्टर अपघाताची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये दहा जण प्रवास करत होते. त्यापैकी चाग जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि मदतनीस होते अशी माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरचा अपघात झाला तेव्हा त्यात 10 जण होते. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

कुन्नूरजवळ निलगिरी जंगल हे अतिशय घनदाट जंगल आहे. चारीबाजूंनी झाडांनी व्यापलेल्या या परिसरात सीडीएस बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर परिसरात आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांची सीमा निलगिरी जंगलालगत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 08-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here