दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

0

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची अखेर घोषणा झाली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं बुधवारी संघ जाहीर केला. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व इशांत शर्मा यांच्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर मोठा निर्णय घेतला गेला. या तिघांनाही अखेरची संधी संघ व्यवस्थापनानं दिली आहे. अजिंक्यकडून उप कर्णधारपद काढून घेण्यात आले असून रोहित शर्मा आता टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. भारत अ संघासोबत आफ्रिका दौऱ्यावर असेल्या हनुमा विहारीनं दमदार कामगिरी करून संघातील स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून मयांक अग्रवालनं त्याची जागा पक्की केली होतीच. श्रेयस अय्यरनं कानपूर कसोटीत पदार्पणातच शतक झळकावून निवड समितीचे मन जिंकले आणि त्यामुळे त्याला आफ्रिका दौऱ्यासाठी संघात कायम राखले गेले. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर यांचे संघात पुनरागमन झाले आहे. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , शुबमन गिल यांना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावे लागले आहे.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज
राखीव – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ – डिल एल्गर, टेम्बा बवुमा, क्विंट डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एर्वी, बेयूरन हेंड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, अॅनरिच नॉर्ट्जे, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन, मार्का जान्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रेनेलान सुब्रायेन, सिसांडा मगाला, रियान रिकेल्टन, ड्युन ऑलिव्हर

भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली कसोटी – २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
दुसरी कसोटी – ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी – ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 09-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here