होय ! दंड-बैठका मारणाऱ्यास प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार मोफत

0

रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयात मिळते. मात्र आता हे तिकीट तुम्हाला मोफत ही मिळू शकते. रेल्वे प्रशासनाने एक असे मशीन आणले आहे ज्यामुळे तुम्ही आता प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळवू शकतात. दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हे मशीन बसवण्यात आले आहे. अर्थात यासाठी पैसे खर्च करावे लागणार नसले तरी शारीरिक मेहनत करावी लागणार आहे. केवळ 180 सेकेंदात 30 दंड-बैठका मारणाऱ्यास प्लॅटफॉर्म तिकीट मोफत मिळणार आहे.शारीरिक स्वास्थ्यासाठी नागरिकांनी जागरुक रहावे याकरता रेल्वे प्रशासनाने हा प्रयोग सुरू केला आहे. या मशीनला ‘फिट इंडिया मशीन’ असे नाव देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी या मशीनचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या मशीन समोर दोन फूटप्रिंट आहेत. त्यावर उभे राहून 30 दंड बैठका मारायच्या आहेत. मशीनच्या मॉनेटरवर तुम्हाला वेळ आणि दंड बैठकांची संख्या दिसेल. 180 सेकेंद पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here