कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाठी 350 किमी प्रवास करून मुंबईमध्ये यावे लागते. तो त्रास कमी व्हावा यासाठी कोकणामध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र उभारणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सद्यस्थितीला मुंबई विद्यापीठात 840 महाविद्यालये आणि 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वे करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक समिती गठित केली. समितीच्या मार्फत एक अॅप लाँच करण्यात आले, त्या अॅपच्या माध्यमातून अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांपासून विद्यार्थ्यापर्यंत सर्वे करण्यात आला. सर्वेमध्ये असे अढळून आले की 100 पैकी 87 प्राचार्याचा आणि 200 पैकी 180 विद्यार्थ्याचा नवीन होणाऱ्या कोकण विद्यापीठाला विरोध आहे. तर 200 पैकी फक्त 20 विद्यार्थ्यांना आणि 100 पैकी फक्त 04 प्राचार्यांना नव्या कोकण विद्यापीठाची संकल्पना मान्य आहे. कोकणात उभारणाऱ्या मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्राला सध्या विद्यार्थ्यांकडूनच कोकण विद्यापीठाला विरोध केला जात असल्याने त्याबद्दलचा विचार राज्य सरकार थांबणार असल्याचे दिसून येत आहे.
