जिल्ह्यात एक नवा कोरोना पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 372 अहवालांमध्ये एक नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 27 रुग्ण उपचारखाली आहेत. जिल्ह्यात 24 तासात 7 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 594 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.82 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 110 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 489 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 14 तर संस्थात्मक विलगीकरणात 13 रुग्ण उपचार घेत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:33 PM 10-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here