रत्नागिरी : निदान झालेले क्षयरुग्ण शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही उपचार घेत असतात. परंतु, खासगी डॉक्टर्स केमिस्ट व खासगी लॅब यांनी या रुग्णांची नोंद फार कमी प्रमाणात नोंदविल्याने जिल्हा प्रशासनाला परिपूर्ण माहिती प्राप्त होत नाही. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी निक्षय प्रणालीवर नोंद करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे टीबी फोरम समितीच्या बैठकीत सांगितले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून क्षयरुग्णांची नोंदणी निक्षय प्रणालीमध्ये करणे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना अनिवार्य आहे. असे मा. जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सुचित केले. क्षयरुग्णांसाठी ५०० रुपये पोषण आहार-लाभ शासनातर्फे दिले जातात. नोंद नसल्यामुळे त्यांना या लाभापासून वंचित रहावे लागते. क्षयरुग्णांचे निदान व बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य संस्थांनी निक्षय प्रणालीमध्ये नाव नोंदवून क्षयरुग्णांची नोंदणी करावी. सर्व संशयीत क्षयरुग्णांची धुंकी तपासणी व एक्स-रे तपासणी तसेच निदान झालेल्या क्षयरुग्णांचा संपूर्ण कालावधीचा उपचार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये मोफत केला जात असून क्षयरुग्णांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सभेचे संचालन व आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 11-Dec-21
