धुत्रोली येथे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नळपाणी योजनेचे भूमिपूजन

0

मंडणगड : आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या धुत्रोली येथील नळपाणी योजनेच्या कामाचे भूमीपूजन १० डिसेंबर २०२१ रोजी आमदार योगेश कदम यांच्या हस्ते व पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीतीत संपन्न झाले. यावेळी बोलताना आमदार योगेश कदम यांनी धुत्रोली गावास कधीही पाणी टंचाईच्या समस्येस भविष्यात कधीही सामोरे जावे लागणार नाही, अशी योजना राबविणार असल्याचे आश्वासित केले. या कामास दहा लाखांचा निधी मंजूर झाला असला तरी जलजीवन मिशनचे माध्यमातून पन्नास लाखांचा निधी मिळवून देवून दीर्घकालीन उपाययोजना लक्षात घेवून पाणी पुरवठा योजना मंजूर करुन आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे विभागप्रमुख इरफान बुरोंडकर यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमास सभापती स्नेहल सकपाळ, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, पंचायत समिती सदस्य आदेश केणे, अहमद मुकादम, शहरप्रमुख विनोद जाधव, अमिता शिंदे, संतोष पार्ट, सरपंच विश्वनाथ सावंत, अनंत लाखण, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण, संजय सुगदरे, अजीम कडवेकर, बाबुराव गुजर, जर्नादन चव्हाण, रवूफ बुरोंडकर, अकबर बरोंडकर, मोहमंदअली बुरोंडकर, प्रकाश पवार. श्रद्धा कदम, अप्पा धामणस्कर, शिल्पा जाधव, राहील कडवेकर, हमीद कडवेकर, जयश्री गुजर, मुश्तफा बुरोंडकर व ग्रामस्थ विश्वास सुगदरे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 11-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here