लाईफ केअरच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

0

चिपळूण : कोव्हिड महामारीसारख्या आपत्कालीन परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. या शिबिराला शहरातील पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.डॉ. नदीम खतीब यांनी डोळ्यांची तपासणी केली आणि डॉ. प्राची दिलवाले यांनी पत्रकारांची तपासणी तसेच आरोग्यविषयक शंकाचे निरसन केले. यावेळी लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. इसहाक खतीब, डॉ नदीम खतीब, डॉ. प्राची दिलवाले, डॉ. शाहीद परदेशी, अभिजित सुर्वे, पत्रकार राजेंद्र शिंदे, नागेश पाटील, लक्ष्मण शेलार, समीर जाधव, योगेश बांडागळे, राज पिलके उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:31 PM 11-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here