रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिद्दी माऊटेनिअर्सतर्फे मान्सून किल्ले ट्रेकिंग हा एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कोंकणातील बहुतांश किल्ल्यांवर जिद्दीतर्फे ट्रेक नेण्यात येणारअसल्याची माहिती अध्यक्ष धीरज पाटकर यांनी दिली. दुर्गवैभव पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिद्दीतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता २५ ऑगस्ट रोजी कुडाळ येथील ‘रांगणा’,१५ सप्टेंबर रोजी पनवेल येथील ‘कलावंतीण दुर्ग’, २२ सप्टेंबर रोजी ‘भैरवगड’, तर २१ व २२ सप्टेंबर रोजी मेगा ट्रेक आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ‘पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड-माचाळ’ अशी ऐतिहासिक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचबरोबर ठाणे येथील आसनगावच्या ‘माऊली ट्रेक’चेही आयोजन १०,११ ऑगस्ट रोजी कारण्यात आले आहे अशी माहिती धीरज पाटकर यांनी दिली.
